esakal | बॉलिवूड अभिनेत्याच्या कारची एकाला धडक; पोलिसात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

बॉलिवूड अभिनेत्याच्या कारची एकाला धडक; पोलिसात गुन्हा दाखल

जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला कूपर रुग्णालयात दाखल केलं. कारची धडक बसलेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

बॉलिवूड अभिनेत्याच्या कारची एकाला धडक; पोलिसात गुन्हा दाखल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूड अभिनेता रजत बेदीविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी त्याच्या कारने मुंबईतील अंधेरी इथं एका व्यक्तीला धडक दिल्याची घटना घडली. यानंतर रजत बेदीने जखमी अवस्थेत त्या व्यक्तीला कूपर रुग्णालयात दाखल केलं. कारची धडक बसलेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

अभिनेता रजत बेदी सोमवारी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास अंधेरी वेस्टमध्ये कारने जात असताना अचानक त्याच्या कारसमोर एक व्यक्ती आली. ती व्यक्ती रजत बेदीच्या कारला धडकून जखमी झाली. त्यानंतर तात्काळ रजत बेदीने जखमी व्यक्तीला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखलं केलं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा: 'सिद्धार्थ शुक्ला हार्ट अ‍ॅटकनं गेलाच नाही, खरं कारण कळू द्या'

पोलिसांनी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणी रजत बेदीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डीएन नगर पोलिस ठाण्यात रजत बेदीविरोधात गुन्हा दाखल झाला असून आपण स्वत: जखमी व्यक्तीला कारने रुग्णालयात नेल्याचे रजतने सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले.

loading image
go to top