esakal | 'सिद्धार्थ शुक्ला हार्ट अ‍ॅटकनं गेलाच नाही, खरं कारण कळू द्या'
sakal

बोलून बातमी शोधा

'सिद्धार्थ शुक्ला हार्ट अ‍ॅटकनं गेलाच नाही, खरं  कारण कळू द्या'

'सिद्धार्थ शुक्ला हार्ट अ‍ॅटकनं गेलाच नाही, खरं कारण कळू द्या'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला siddharth shukla याचं हदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्याच्या निधनानं सारं बॉलीवूड हळहळलं. अनेक मान्यवरांनी त्याला श्रद्धांजलीही वाहिली. त्याच्या जाण्यानं चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. ते अद्याप त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. अशावेळी सिद्धार्थच्या बाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येताना दिसत आहे. त्याची जवळची मैत्रीण शहनाज गिलनं गेल्या काही दिवसांपासून अन्नपाणी वर्ज्य केलं आहे. तिलाही मोठा मानसिक धक्का बसला आहे. यासगळ्या परिस्थितीवर बॉलीवूडची प्रसिद्ध सेलिब्रेटी राखी सावंतनं rakhi sawant एक मोठा खुलासा केला आहे. तिनं जे विधान केलं आहे, त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

आपल्या वादग्रस्त विधानासाठी राखी नेहमीच चर्चेत असते. त्या विधानांवरुन आपण कितीही टीकेचे धनी झालो तरी चालेल मात्र ती गोष्ट बिनधास्तपणे मांडायची असा स्वभाव राखीचा आहे. यामुळे तिला अनेकदा ट्रोलही व्हावे लागले आहे. त्याचा तिला काहीही फरक पडत नाही. सिद्धार्थच्या जाण्यानंतर तिनं अशाच प्रकारचे एक धक्कादायक विधान केलं आहे. बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्ये सिद्धार्थनं भाग घेतला होता. त्या शो मध्ये त्याच्या वाट्याला मोठी लोकप्रियता आली होती. यात त्यानं अनेकांशी पंगाही घेतला होता. काही दिवसांपासून त्याची आणि सिद्धार्थ डे बरोबरच्या वादावादीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे..

राखीनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात ती कमालीची भावूक झाली आहे. राखी त्या व्हिडिओमध्ये म्हणते, मित्रांनो मी सध्या घरीच आहे. कुठेही बाहेर जाता येत नाही. सिध्दार्थच्या जाण्यानं मोठा धक्का मला बसला आहे. त्याचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर आला. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे समोर आले आहेत. त्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, त्याचा मृत्यु हा हदयविकाराच्या झटक्यानं झालेला नाही. अजूनही त्याच्या अनेक गोष्टींची तपासणी होणं बाकी आहे. मी त्यामुळे चिंताग्रस्त आहे. राखी पुढे म्हणते, त्याच्या गाडीची काचही तोडण्यात आली होती. त्याची कुणाशी भांडणं झाली होती का, तो रात्री आठ वाजता कुणाला भेटायला गेला होता, जेव्हा तो घरी आला तेव्हा त्यानं आईला सांगितलं की, माझी तब्येत बरी नाही. पहाटे तीन वाजता देखील तेच सांगितलं. त्यानंतर त्यानं जे औषध घेतलं ते कोणतं होतं असा सवाल राखीनं यावेळी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: सिद्धार्थ गेला, शहनाजनं सोडलं जेवण...

हेही वाचा: 'मी मरेन पण तुला घेऊनच' सिद्धार्थ शुक्ला कुणाबद्दल बोलला होता...

loading image
go to top