
Puja Khedkar
ESakal
नवी मुंबई : एका किरकोळ अपघातावरून सुरू झालेल्या वादातून ऐरोली येथे एका ट्रक हेल्परचे अपहरण केल्याप्रकरणी माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा खेडकर आणि अंगरक्षक प्रफुल्ल साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रफुल्ल साळुंखे याला धुळ्यातून अटक केली आहे, तर दिलीप आणि मनोरमा खेडकर अद्याप फरार आहेत.