मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या 81,634;  आज झाली 'इतक्या' रुग्णांची नोंद

corona testing.
corona testing.

मुंबई : शुक्रवारी मुंबईत मान्सूनने दमदार पुनरागमन केले असल्याने आज दिवसभरात मुसळधार पाऊस झाला. पावसासोबतच साथीच्या आजारांचे प्रमाणही वाढण्याची भीती असताना मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण कायम आहे. शुक्रवारी 1372 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 81,634 झाली आहे. तर आज 73 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 4,759 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 1698 रुग्ण बरे होऊन घरी गेले.

मुंबईत आज नोंद झालेल्या 73 मृत्यूंपैकी 58 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 49 पुरुष तर 24 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी चौघांचे जणांचे वय 40 च्या खाली होते. तर 40 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 29 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 1139 नवे संशयित रुग्ण सापडले असून आतापर्यंत 56,521 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 1,698 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  52,392 रुग्णांना घरी सोडण्यात आले.  

मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 64 टक्के इतका आहे. तर 2 जून पर्यंत एकूण 3,44,968 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या. तर 26 जून ते 2 जुलै दरम्यान कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर हा 1.72 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा 41 दिवसांवर गेला आहे.                 

मुंबईत 6352 इमारती सील
मुंबईत 757 सक्रिय कंटेन्मेंट झोन असून आतापर्यंत 6352 इमारती सीलबंद करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 9800 अति जोखमीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून सीसीसी 1 मध्ये 12,465 अति जोखमीच्या संपर्कातील व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. तर आतापर्यंत संस्थेमध्ये 1,15,692 लोकांचे अलगीकरण करण्यात आले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com