एकीकडे कोरोना तर दुसरीकडे मलेरिया, गॅस्ट्रोने डोके काढले वर, पालिकेसमोर मोठं आव्हान   

एकीकडे कोरोना तर दुसरीकडे मलेरिया, गॅस्ट्रोने डोके काढले वर, पालिकेसमोर मोठं आव्हान   

मुंबई, ता. 25 : कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना मुंबईत मलेरिया, गॅस्ट्रो तसेच लेप्टो डोके वर काढत असल्याने पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत मलेरियाचे 249, गॅस्ट्रोचे 127 आणि लेप्टोचे 23 रुग्ण आढळले आहेत. मात्र आजारांमुळे नोव्हेंबरमध्ये एकही मृत्यू झाला नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या आरोग्य विभागाने उपाययोजनांवर भर दिला आहे. 

जून ते सप्टेंबर या काळात पालिकेने केलेल्या उपाययोजनामुळे मुंबईत कोरोनासह अन्य साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यात पालिकेला यश मिळाले. सध्या रात्री थंडी आणि दिवसा उकाडा अशा विषम वातावरणामुळे हे आजार वाढत आहेत.  मात्र  गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापेक्षा हे आजार तुलनेत कमी आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मलेरियाचे 299, लेप्टो 32, डेंग्यू 180, गॅस्ट्रो 535, हिपेटायटिस 73 आणि एच1एन1चे 3 रुग्ण आढळले होते. 

कोरोनाचे संकट असताना साथीचे आजार रोखण्यासाठी, तसेच डास प्रतिबंध करण्यासाठी कीटकनाशक विभागाच्या माध्यमातून जंतूनाशक धूरफवारणी, डासांच्या अळ्यांची स्थाने नष्ट करण्याचे काम सुरू आहे. कोरोना सह इतर आजारांचे आक्रमण थोपवण्यासाठी आरोग्य विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत

नोव्हेंबरची तुलनात्मक स्थिती                                                                   

      आजार                    रुग्ण (2019)            रुग्ण (2020)

  • मलेरिया                   299                       249
  • लेप्टो                         32                        23
  • डेंग्यू                         180                      17
  • गॅस्ट्रो                        535                      127
  • कावीळ                     73                        17
  • एच1एन1                   3                          0

गेल्या वर्षी मलेरियाचे 4357 रुग्ण , 0 मृत्यू तर या वर्षी 4553 रुग्ण एक मृत्यू, लेप्टोचे गेल्यावर्षी 281 रुग्ण 11 मृत्यू तर यावर्षी 222 रुग्ण 6 मृत्यू, डेंग्यू गेल्या वर्षी 920 रुग्ण 3 मृत्यू यावर्षी 115 रुग्ण 2 मृत्यू, गॅस्ट्रोचे गेल्या वर्षी 7785 रुग्ण यावर्षी 1316 रुग्ण, हिपेटायटीसचे गेल्या वर्षी 1534 रुग्ण या वर्षी 245 रुग्ण, एच1एन1 गेल्या वर्षी 451 तर यावर्षी 44 रुग्ण आढळले आहेत. यावरून मलेरिया वगळता इतर आजारांची स्थिती नियंत्रणात असल्याचे दिसते.

याबाबत बोलताना महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाला, जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या दिवासांमध्ये पालिकेने योग्य ती  खबरदारी घेतल्याने साथीचे आजार दरवर्षीच्या तुलनेत नियंत्रणात आहेत. आजारांचा सामना करण्यासाठी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय  रुग्णालये सज्ज आहेत. नागरिकांनी घराच्या घरीच उपचार न घेता, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.

( संपादन - सुमित बागुल )

cases of malaria dengue and gastro increasing controlling these diseases is new challenge

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com