मुंबईत सर्दी खोकल्याचा जोर वाढला मात्र कोरोना आणि सर्दी खोकल्यात गल्लत नको

मिलिंद तांबे
Thursday, 31 December 2020

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने गारठा वाढला आहे.

मुंबई, ता. 31 : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने गारठा वाढला आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला अशा अन्य विषाणूजन्य आजारांचं प्रमाण वाढले आहे. कोरोनामध्येही अशाच प्रकारची लक्षणं आढळून येत असल्यानं नागरिकांनी वेळीच डॉक्टरांकडं जाऊन यांचं निदान आणि उपचार करणं गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

मुंबईतील पारा खाली गेला आहे. गेल्या आठवड्याभरापासून मुंबईतील तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. त्यामुळे हवेतील गारठा प्रचंड वाढला आहे. गारठ्यासह मुंबईत प्रदूषणाचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वातावरणातील हे बदल विषाणूजन्य आजारांच्या वाढीसाठी पोषक ठरत असून त्यामुळे गेल्या काही दिवसांत सर्दी, ताप, खोकला, घसादुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत.

महत्त्वाची बातमी : प्रदूषणास जबाबदार कपन्यांना MPCB च्या नोटिसा, MMR भागातील या 40 कंपन्या पसरावतायत प्रदूषण

गारठा किंवा प्रदुषण वाढलं की विषाणुजन्य आजारांमध्ये वाढ होते. त्यामुळे काही दिवसांपासून सर्गी, ताप, खोकल्याचे काही प्रमाणात वाढते आहेत. रूग्णांनी कोरोनाची भिती न बाळगता डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. 

- डॉ मोहन जोशी , अधिष्ठाता , सायन रूग्णालय

मुंबईतील सरकारी रूग्णालयांत सर्दी, ताप, खोकल्याच्या रूग्णांचा ओघ काही प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे रूग्णालयांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या रूग्णांचे प्रमाण 20 टक्के वाढले आहे. कोरोना आणि विषाणुजन्य आजारांची लक्षणे सारखी असल्याने लोकांमध्ये काहीशी चिंता व्यक्त होत आहे. मात्र अंगात सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे असली तरी त्याकडे दुर्लक्ष न करता  डॉक्टरांकड जाऊन उपचार करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधांच्या दुकानातून स्वता औषधे न घेण्याचा सल्लाही डॉ राहुल घुले यांनी दिला आहे.

मुंबई भागातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा । Mumbai News in Marathi from Thane, Navi Mumbai, Vasai-Virar, Mira Bhayandar, Kalyan Dombivali 

'अशी' घ्या काळजी

  • मास्क,सॅनिटायझरचा वापर आणि समाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
  • कोवळे ऊन आल्यानंतर फिरायला जावे.
  • धुरके वाढल्यानं सकाळच्या वेळेत फिरायला जाणं शक्यतो टाळावे.
  • दमा, अस्थमाच्या रुग्णांनी या काळात विशेष काळजी घ्यावी.
  • हवेत गारठा वाढल्याने शक्यतो कोमट पाणेयैचो सेवन करावे.
  • दिवसातून दोन वेळेस हलकी वाफ घ्यावी.

cases of viral infection like cough cold increased consult doctors if symptoms are seen


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cases of viral infection like cough cold increased consult doctors if symptoms are seen