esakal | या वर्षातला अत्यंत किळसवाणा प्रकार : कचराकुंडीतील भाज्या विक्रीला...
sakal

बोलून बातमी शोधा

या वर्षातला अत्यंत किळसवाणा प्रकार : कचराकुंडीतील भाज्या विक्रीला...

शिवडीतील व्हिडीओमुळे खळबळ...

या वर्षातला अत्यंत किळसवाणा प्रकार : कचराकुंडीतील भाज्या विक्रीला...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचा तुटवडा जाणवू लागलाय. शिवाय भाज्या महाग देखील झाल्या आहेत. त्यामुळे या परिस्थितीत लोकं मिळेल त्या ठिकाणावरून भाज्या, फळे खरेदी करतात. मात्र शिवडी कोळीवाड्यातील एक भाजी विक्रेता हा चक्क कचरा कुंडीत फेकलेली भाजी विक्रीसाठी नेत असल्याचे समोर आले आहे. एका तरुणाने व्हिडीओ तयार करून हा प्रकार समोर आणला आहे. या प्रकारामुळे लॉकडाऊनच्या नावावर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून भाज्या किंवा खाद्यपदार्थ विकत घेताना काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

...तर मुंबईत आक्रमक पावले उचलणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

शिवडी कोळीवाड्यात राहणाऱ्या रुपेश ढेरंगे या तरुणाने शिवडी कोळीवाड्यातील एका इसमाला कचऱ्यातील भाज्यांच्या पिशव्या आपल्या हातागाडीवर ठेवताना पाहिले. मात्र तो नेमका कशासाठी या भाज्या हातागाडीवर ठेवत आहे ते काही काळ त्यांना समजले नाही. त्यानंतर यांनी या हातागाडीवर लक्ष ठेवले. आणि नेमके ही भाजी कुठे घेऊन जात आहे ते पाहिलं. पुढे गेल्यावर या विक्रेत्याने आपल्या हातगाडीवरच्या भाज्या विक्रीसाठी काढल्या. त्यानंतर ढेरंगे यांनी आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ बनविण्यास सुरुवात केली.

ठाणे जिल्ह्यातील संकट आणखी गडद! 24 तासांत 142 नवे रूग्ण; वाचा सविस्तर आकडेवारी

या भाजी विक्रेत्याकडे भाजीबद्दल विचारणा केली असता या भाज्या मी खरेदी करून आणल्या आहेत असे त्याने सांगितले. त्यानंतर पहिल्यापासून हा प्रकार मी पाहिला असल्याचे ढेरंगे यांनी त्याला सांगितले असता, त्याची पाचावर धारण बसली. आणि त्याने ही भाजी कचरा कुंडीतून घेतली असल्याचे कबूल केले. त्यानंतर ढेरंगे यांनी ती हातगाडी पुन्हा कचरा कुंडीजवळ घेण्यास सांगून त्या सर्व भाज्या कचराकुंडीत फेकण्यास सांगितल्या. तसेच आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी भाज्या घेताना दक्ष राहावे असा  ढेरंगे यांनी सल्ला दिला.

caught on camera man picked vegetable thrown in bin and sold in shivadi  


 

loading image