...तर मुंबईत आक्रमक पावले उचलणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

...तर मुंबईत आक्रमक पावले उचलणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा
...तर मुंबईत आक्रमक पावले उचलणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा इशारा

मुंबई : क्वॉरंटाईनचा कालावधी 14 दिवसांपेक्षा कमी असावा. यासाठी प्रयत्न सुरू असून कोरोनाची लक्षणे कोणी लपवून न ठेवता पुढे यावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वॉरंटाईनवर भर देण्यासाठी आक्रमकपणे पावले उचलणे आवश्‍यक असून, त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये असून, ते पुन्हा ऑरेंज झोनमध्ये जाणार नाहीत आणि रेड झोनमधील जिल्ह्यांचा रेड झोनकडे प्रवास होणार नाही. यासाठी कंटेनमेंट झोनमधील नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्‍यक असल्याचे राजेश टोपे यांनी आज सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. 

"केंद्राचे पथक राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत या पथकाची बैठक झाली. त्यांनी मुंबईत दाट लोकवस्तीतील पॉझीटिव्ह रुग्णांपासून निकट सहवासितांना होणारा संसर्ग टाळण्यासाठी संस्थात्मक क्वॉरंटाईन करणे आवश्‍यक असल्याच्या मुद्द्यावर भर दिला. त्याप्रमाणे मुंबई महापलिकेला सूचना देण्यात आल्या असून, आता अधिक आक्रमकपणे संस्थात्मक क्वॉरंटाईनसाठी कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी मैदाने, हॉल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. "मुंबईत रुग्णवाढीचा गणितीशास्त्रानुसार जो अंदाज मांडला जात आहे, त्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करत नाही; मात्र रुग्णसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत नाही. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे 

  • "मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, बीकेसी, गोरेगाव येथे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून त्याद्वारे सुमारे दोन हजार नवीन खाटा उपलब्ध होणार आहेत. 
  • "राज्यात सध्या 64 प्रयोगशाळा असून त्या माध्यमातून दिवसाला सुमारे 9 ते 10 हजार चाचण्या होत आहेत. 
  • "प्रयोगशाळांवरील चाचण्यांचा भार कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या 14 दिवसांनंतर करण्यात येणाऱ्या दोन चाचण्यांचा कालावधी कमी करून तो सात दिवसांवर किंवा 10 दिवसांवर आणावा का? किंवा दोन ऐवजी एकच चाचणी करावी का? याबाबत आयसीएमआरकडून लवकरच मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील. 
  • "लक्षणे असतील तर ती समाजाच्या भीतीने लपवू नका. संसर्ग टाळण्यासाठी पुढे येऊन लवकर निदान करून घ्या. समाजाचे नुकसान होऊ देऊ नका. लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी वर्तणुकीतील बदलाबाबत जाणीवजागृती केली जात आहे. 
  • "आरोग्य विभागातील एकही जागा रिक्त राहणार नाही. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता मिळाली आहे. 
  • लॉकडाऊनच्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने पदभरतीचे काम केले जाईल. 
  • कोरोना वगळता अन्य आजारांच्या रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया होणे आवश्‍यक आहे. 
  • खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांकडून मनमानी पद्धतीने बिल आकारणी करू नये, त्यासाठी राज्य शासनाने अशा मनमानी आकारणीला चाप लावण्याचे काम केले आहे. 
  • लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरू करण्यापूर्वी आवश्‍यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com