
मुंबई: पुर्व उपनगरात वायू गळतीचा अद्याप शोध लागलेला नाही. महापालिकेने गोवंडी येथील यूस व्हिटमीन या कंपनीसह घाटकोपर पवई परीसरात अग्निशमन दलाने शोध घेतला मात्र उगम पहाटे पर्यंत सापडला नाही. अग्निशमन दलाचे 17 बंब व गॅॅॅस गळती शोधक वाहान तैनात ठेवण्यात आले आहे.
चेंबूर मानखुर्द परीसरात गॅसचा वास येत असल्याच्याा तक्रारी अग्निशमन दलाला प्राप्त झाल्या होत्या. नंतर गॅसचा वास घाटकोपर विक्रोळी पवई आणि अंधेरी परीसरात गॅसचा वास येत असल्याच्या तक्रारी आल्या.त्यानुसार अग्निशमन दलाने या भागात तपासणी केली. त्याच बरोबर देवनार परीसरातील औषध बनवणाऱ्या युएस व्हिटामिन्स या कंपनीच्या परीसरात गॅस गळती होत असल्याचा मेसेज व्हायरल झाला होता.या कंपनीच्या 1 ते 2 किलोमिटरच्या परीसरात अग्निशमन दलाने शोध घेतला तेथेही गळती आढळली नाही.
गॅस गळतीच्या तक्रारी आलेल्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 17 बंब आणि जवानांचे पथक पाहाटे पर्यंत या गळतीचा शोध घेत होते.मात्र,उगम सापडला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाची यंत्रणा तैनात ठेवण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, महानगर गॅस तसेच राष्ट्रीय केमिकल आणि फल्टिलायझर या कंपन्यांनाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
काही महिन्यापुर्वीही याच परीसरात वायू गळतीच्या तक्रारी आल्या होत्या.मात्र,तेव्हाही गळती सापडली नव्हती. काही परीसरात गॅस गळतीच्या दहशतीने नागरीक पहाटे पर्यंत जागे होते.
महापालिकेच्या आपात्कालीन नियंत्रण विभागा मार्फत एखाद्या घटनेचा मेसेज ज्या स्वरुपात माध्यमांना पाठवला जातो.त्या स्वरुपाचा मेसेज रात्री व्हायरल झाला होता.यात युएस व्हिटामिन कंपनीत वायू गळती झाली असून अग्निशमन दल कार्यरत आहे.असे नुमद केले होते.मात्र,अग्निशमन दलाकडे अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.