मुंबई महापालिकेचा 'तो' डॅशबोर्ड 'Not Working'!

मुंबई महापालिकेचा 'तो' डॅशबोर्ड 'Not Working'!

मुंबई : कोरोना व्हायरसनं मुंबईत थैमान घातलं आहे. मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढतोय. त्यातच मुंबईतील रुग्णालय खचाखच भरल्यानं खाटांसाठी रुग्णांसाठी वणवण होते. पण या रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी पालिकेनं रुग्णालयातल्या खाटांची माहिती ऑनलाइन उपलब्ध करुन देणारा डॅशबोर्ड तयार केला. शुक्रवारी रात्रीपासून महापालिकेनं वेबसाइटवर हा डॅशबोर्ड सुरु केला. मात्र आताच समोर आलेल्या माहितीनुसार, हा डॅशबोर्ड चालत नसल्याची माहिती समोर आली आहे. 

https://mumgis.mcgm.gov.in/MedicalFacility.html  या लिंकवर क्लिक करताच Not Found असा मॅसेज दिसत आहे. 

दर अर्धा तासात रिकाम्या झालेल्या बेडची माहिती तिथे अपलोड होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात पालिका आणि खासगी अशा 128 रुग्णालयांतील खाटांची माहिती पालिकेच्या वेबसाइटवर देण्यात आली. मुंबईत सध्या 75 हजार खाटा तयार असून त्यामध्ये सीसीसी 1 आणि डीसीएच यांच्या संख्या 44 हजार आहे. 

मुंबईतला रुग्णांचा रोजचा वाढता आकडा बघता, अनेक रुग्णांना पालिका आणि खासगी रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नसल्याच्या बऱ्याच तक्रारीही पालिकेकडे उपलब्ध झाल्या होत्या. त्यानंतर रुग्णालयातील खाटांची ऑनलाइन माहिती मिळण्यासाठी डॅशबोर्ड स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पालिकेकडून रुग्णालयातल्या खाटांसाठी डॅशबोर्ड तयार करण्याचं काम सुरु होतं. तसंच आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दहा दिवसांपूर्वी लवकरच डॅशबोर्ड सुरू होईल, अशी माहिती दिल्यानंतरही प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नव्हती. आता डॅशबोर्ड सुरू झाला, अशी माहिती मिळाली असताना, प्रत्यक्षात मात्र संबधित लिंक वर क्लिक केल्यास, डॅशबोर्ड अॅक्टिव्ह नसल्याचे लक्षात येत आहे,

असा आहे डॅशबोर्ड 

कोरोना आणि कोरोना व्यतिरिक्तच्या आजारांसाठी कुठे, किती खाटा, किती भरल्या आहेत, किती रिक्त तसेच कोरोना संशयित पॉझिटिव्ह, आयसीयू, व्हेंटिलेटर, डायलिसिस खाटांची आणि कोरोना काळजी केंद्रातील खाटा यांची संख्या या डॅशबोर्डवर पालिकेकडून देण्यात येणार आहे. पालिकेच्या 1916 या हेल्पलाइनवर खाटांसाठी नोंदणी करता येईल, तसेच खाटा उपलब्धतेची माहिती घेता येईल.

मुंबई महापालिकेचा हेल्पलाइन नंबर

मुंबई महापालिकेनं एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. कोविड केअर सुविधेविषयीच्या तक्रारी नागरिक आता 1916 या हेल्पलाईन नंबर दाखल करु शकणार आहेत. रुग्णांना हेल्पलाइन नंबरद्वारे नॉन कोविड खाटांची उपलब्धतेची माहिती देखील मिळू शकणार आहे. कोरोना रुग्णांसाठी जवळच्या कोणत्या रुग्णालयात जागा होऊ शकेल हे तात्काळ समजण्यासाठी हेल्पलाइनवर आता खास सोय करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com