कोणामुळे होतोय कोरोनाचा अधिक प्रसार,संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

कोणामुळे होतोय कोरोनाचा अधिक प्रसार,संशोधनातून धक्कादायक माहिती उघड

मुंबईः कोरोना विषाणुंबाबत नवनवे खुलासे समोर येत आहेत. लक्षणे विरहीत सशक्त व्यक्तींमुळे कोरोना विषाणुंचा प्रसार अधिक होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे लोकांना ओळखणे आणि त्यांचं विलगीकरण करणे अवघड झाले आहे.यामुळे प्रसार रोखणे फारच कठीण झाले आहे.

कोरोना संसर्गामध्ये अनेक लोकांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष नोंदवण्यात आला. लक्षण विरहीत रूग्ण इतरांना बाधा करत नाही किंवा रूग्ण आजारी पडतो पण त्याला कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या रूग्णांचा यासाठी अभ्यास केला गेला. दक्षिण कोरीयातील जामा इंतरनल मेडीसिननं या संबंधिचे संशोधन केले.

लक्षण विरहीत रूग्णाच्या नाक,घसा आणि फुफ्फूसांत मोठ्या प्रमाणावर विषाणू असतात. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विषाणूंचा प्रसार होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता लक्षण विरहीत रूग्ण कोरोना विषाणूंचा अधिक प्रसार करत असल्याचे समोर आले असल्याचे हॉंगकॉंग युनिव्हर्सिटीचे संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख बेंजामिन कॉलिंग यांनी म्हटलं.

काही लक्षणे विरहीत रूग्ण हे आजारी पडतात तर काही लक्षण विरहीत रूग्णांची प्रकृती ठणठणीत असते. या रूग्णांचा नेमका परिणाम काय होतो याबाबत संशोधकांमध्ये काहीसा संभ्रम होता. नवीन संशोधनाने हा संभ्रम दूर केला. यासाठी चीनमधील रूग्णांच्या अहवालांचा जानेवारीपासून अभ्यास करण्यात आला, असल्याचं मनिटोबा युनिर्व्हसिटीतील व्हायरोलॉजीस्ट डॉ जँसन किंड्राचक यांनी सांगितले. लक्षण विरहीत लोकांकडून विषांणूंचा प्रसार नेमका कसा होतो याबाबत नेमकी माहिती यापूर्वी उपलब्ध नव्हती असे ही ते पुढे म्हणाले.

संशोधकांनी विषांणूंचा प्रसार कसा होतो किंवा त्याच्या प्रसाराच्या साखळीचा अभ्यास यात केला नाही. तर रूग्णातील विषाणू्च्या उत्पत्ती आणि वाढ यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले. त्यातून लक्षणे विरहीत लोकं विषाणूंचा प्रसार अधिक करत असल्याचे समोर आले. लक्षणे असलेल्या रूग्ण हे विषाणूंचा प्रसार कसा करतात याबाबतची माहित असल्यानं या संशोधनात अशा लोकांचा विचार केला नसल्याचं टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या व्हयरोलॉजिस्ट मार्टा गँग्लिया यांनी सांगितले.

लक्षण विरहीत लोकांना कफ किंवा श्वसनाचा त्रास होत नसल्याने त्यांच्या बद्दल इतर अनभिज्ञ असतात त्यामुळे ते इतर रूगांपेक्षा अधिक विषाणूंचा प्रसार करत असल्याचे डॉ कॉलिंग यांचे म्हणणे आहे. तर लक्षणे असलेले रुग्ण हे आपल्या घरात किंवा अंथरूणावर असतात त्यामुळे त्यांच्यापासून संसर्ग मर्यादित स्वरूपात पसरतो मात्र लक्षण विरहीत रूग्ण हा आपले घर , कार्यालय,बाजार इत्यादी ठिकाणी देखील विषाणूंचा प्रसार करत असल्याचे डॉ गँग्लिया यांनी सांगितलं.

दक्षिण कोरीयातील संशोधकांनी यासाठी 6 मार्च ते 26 मार्चच्या दरम्यान 193 लक्षणे असलेले तर 110 लक्षणे विरहीत लोकांचता अभ्यास केला. त्यातील 30  टक्के म्हणजे एकूण 89 लोकं हे लक्षण विरहीत तर 21 लोकांमध्ये लक्षणे आढळली. संशोधनासाठी निवडलेले सर्व रूग्ण हे साधारणता 25 वयोगटातील तरूण होते.

एकूण लोकसंख्य़ेपैकी साधारणता 30 टक्के लोकं लक्षण विरहीत आहेत. त्यांना 
कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. आरोग्याच्या दृष्टीने ही जरी चांगली गोष्ट असली तरी अश्या लोकांमुळे संसर्गाचा प्रसार अधिक होत असल्याने काळजी घेणे महत्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

(संपादनः पूजा विचारे)

causing more spread corona research reveals shocking information

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com