esakal | 13 वर्षांपासून पुनर्वसन रखडले; अतिक्रमणामुळे जोगेश्वरी गुंफा गुदमरतेय 
sakal

बोलून बातमी शोधा

13 वर्षांपासून पुनर्वसन रखडले; अतिक्रमणामुळे जोगेश्वरी गुंफा गुदमरतेय 

2004 जोगेश्‍वरी गुफेच्या परीसरातील अतिक्रमणा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती

13 वर्षांपासून पुनर्वसन रखडले; अतिक्रमणामुळे जोगेश्वरी गुंफा गुदमरतेय 

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई : जोगेश्‍वरी येथील गुफेच्या परीसरातील अतिक्रमण हटविण्यात महानगर पालिकेला गेल्या 13 वर्षांपासून अपयश आले आहे. या गुफेच्या परीसरात अद्याप 127 अतिक्रमणे आहे. ही अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने सुधार समितीत मांडली आहे. या लेण्यांचा 25 मिटर परीघरात उद्यान विकसीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र,अतिक्रमण हटत नसल्याने हे उद्यानही उभारले जात नाही.

महत्त्वाची बातमी : धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी घाला, भाजपची मागणी

जोगेश्‍वरी येथील ही गुंफा इ.स.पुर्वी 520 ते 550 या काळातील बौध्द लेणी आहे. त्यात नंतर हिंदू धर्माचे शिल्पही साकारण्यात आले आहे. मात्र, मुंबईचा पुरातत्व वारसा असलेली लेणी आजही अतिक्रमणात गुरफटली आहे. 2007 मध्ये या लेण्यांच्या परीसरातील अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. आतापर्यंत 322 निवासी झोपड्या आणि व्यावसायिक गाळ्याचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यातील लेणीला लागून असलेल्या 60 झोपड्यांचे पुनर्वसन जोगेश्‍वरी परीसरातच करण्यात आले आहे. या गुफेच्या 25 मिटर परीसरात उद्यान तयार करण्यासाठी हा भुखंड ताब्यात घेण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे.

हा प्रस्ताव गुरुवारी (ता.29) झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत प्रशासनाने मांडण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावात काही उणीवा असल्याने तो राखून ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे सदस्य अनंत नर यांनी हा भुखंड ताब्यात घेऊन त्या लेण्यांना साजेशे थिम पार्क तयार करण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप हा परीसर अतिक्रमण मुक्त होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत तत्काळ पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. 2009 मध्ये या लेण्यांच्या परीसरात उद्यान विकसीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महत्त्वाची बातमी :  राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन, म्हणालेत "मला तुमच्याशी बोलायचा सल्ला मिळाला आहे"

या चाळी आणि वसाहतींमुळे गुफेचे नुसकसान झाले आहे. गुफेच्या परीसराला डंपिंगचे स्वरुप असल्याने सौंदर्य नष्ट होत आहे. त्याचबरोबर सांडपाणी सतत गुफेत गळत आहे. त्यामुळे शिल्पांची झिज झाली आहे. असेही सांगण्यात आले. याबाबात प्रशासनाला अहवाल सादर करुन सदस्यांनी विचारलेल्या प्रश्‍नाची उत्तर देण्याची सुचना करण्यात आली असल्याचे सुधार समितीचे अध्यक्ष गजानन परब यांनी सांगितले.

अतिक्रमणाची स्थीती काय

  • पुनर्वसन झालेले - 322
  • पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु - 75
  • पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत - 52

नक्की काय आहे
2004 जोगेश्‍वरी गुफेच्या परीसरातील अतिक्रमणा विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर सुनावणी देताना 2007 मध्ये मुंबई महापालिका, महसुल विभाग आणि पोलिस विभागाशी समन्वय साधून भारतीय पुरातत्व विभागाने या लेणीच्या परीसरातील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पालिकेने लेण्यांच्या परीसरातील अतिक्रमणाची यादी तयार केली. फेब्रुवारी 2010 पर्यंत पालिकेने पहिल्या टप्प्यात लेणीसाठी धोकादायक असलेल्या 60 घरांचे पुनर्वसन केले होते. त्यानंतर अद्याप लेणीला अतिक्रमण मुक्त करण्याचे काम सुरु आहे.

( संपादन - सुमित बागुल )

caves of jogeshwari dying due to massive encroachment around it