esakal | अनिल देशमुख यांना सीबीआयचा समन्स; जबाब नोंदवणार

बोलून बातमी शोधा

anil_20deshmukh_

 केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावला आहे. त्यानुसार 14 एप्रिलला जबाब नोंदण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे

अनिल देशमुख यांना सीबीआयचा समन्स; जबाब नोंदवणार
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावला आहे. त्यानुसार 14 एप्रिलला जबाब नोंदण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. अधिक्षक दर्जाचा अधिकारी त्यांचा जबाब नोंदवणार आहे. उच्च न्यायालयाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर सीबीआयने तात्काळ चौकशीला सुरुवात करीत परमबिर सिह यांच्यानंतर रविवारी अनिल देशमुख यांच्या  दोन स्विय सहाय्यकांचा जबाब नोंदविला. आता देशमुख यांचा जबाब सांताक्रुझ येथील डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे नोंदवणार की आणखी दुस-या ठिकाणी याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.

अनिल देशमुख यांचे खासगी सचिव एस कुंदन आणि संजीव पालांडे यांना देखील बोलावुन त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. तत्पुर्वी अँटिलिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाझे, महेश शेट्टी बार मालकासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, तक्रारदार अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उच्चन्यायालयाने दिले होते. याप्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबाने केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचा जबाबही नोंदवला.

मुंबईकरांनो जरा जपून.... वाचा चिंता वाढवणारी बातमी

दरम्यान, सचिन वाझेच्या केबिनमधून मिळालेली डायरीही सीबीआयने आपल्या ताब्यात घेतली आहे. या डायरीत त्याच्या सर्व वसुलीचा रेटकार्डचा उल्लेख आहे. तसेच कोणासोबत किती रुपयांचा व्यवहार झाला ही बाबही नमूद करण्यात आली आहे. तर सचिन वाझेच्या निकटवर्ती महिलेच्या घरातूनही एनआयएला डायरी मिळाली होती. ती डायरीही सीबीआयने एनआयएकडून आपल्या ताब्यात घेतली आहे.