
मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असल्याचं आता सीबीआयनंच स्पष्ट केलंय. दारुच्या नशेत तोल गेल्यानं आणि १४ व्या मजल्यावरुन पडून दिशाचा मृत्यू झाला; त्यामुळे तपास बंद केल्याचं CBI नं आपल्या अहवालात म्हटलंय. पण, आता यावरुनच राजकारणात नवा वाद रंगलेला दिसतोय.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप त्यावेळी राणे पितापुत्रांनी केला होता. दिशाचा सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोपही राणेंनी केला होता. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले होते. पण आता सीबीआयनेच आपल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत. तर, दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचं ठाकरे गटाने म्हटलंय आणि राणे पितापुत्रांना धारेवर धरलंय.
हेही वाचा Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?
आदित्य ठाकरेंनी आपल्याला त्या घाणेरड्या राजकारणाविषयी बोलायचं नाही असं स्पष्ट केलं. निर्लज्जाला सीमा नसते हेच यातून दिसते. वैयक्तिकरित्या बदनाम करण्याचे काम केले गेले. कुठे आहेत आता ते भाजपचे प्रवक्ते? आदित्य ठाकरेंना बदनाम केले गेले. आमची मागणी आहे की बदनाम करणाऱ्यांनी माफी मागावी. वैयक्तिक स्तरावर बदनाम करणाऱ्यांना ही चपराक आहे, असं सचिन अहिर यांनी म्हटलं.
किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं की, सत्यमेव जयते. यामुळे कुटुंबियांना किती मनस्ताप झाला ते लक्षात घ्या. केंद्रीय मंत्री आणि त्यांच्या मुलांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. हकनाक बदनाम करणारे, षड्यंत्र करणाऱ्यांचा चेहरा समोर आला.
दरम्यान नितेश राणे मात्र गिरे तो भी टांग उपर अशाच मनस्थितीत दिसताहेत. दिशा सालियन प्रकरणातील सीबीआयच्या निरीक्षणांवर मला काही बोलायचं नाही. सीबीआय या प्रकरणात ७२ दिवसांनी आली. ८ जूनपासून या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारच्या मदतीनं स्वच्छता मोहीम सुरुच होती, त्यामुळे जेव्हा सीबीआयचा प्रवेश झाला तोपर्यंत त्यांच्या हाती काही मिळेल असं राहिलं नव्हतं... Master of all Cover ups! अशा शब्दात नितेश राणेंनी तत्कालीन महाविकासआघाडी सरकारवरच टीका केली.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण गाजलं ते सुशांतसिंह राजपूतमुळेच. कारण ९ जूनला दिशाचा मुंबईतल्या मालाडमधील राहत्या घरी अपघाती मृत्यू झाला तर १४ जूनला सुशांत सिंह राजपूतनं वांद्र्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. दोघांमधलं कनेक्शन म्हणजे दिशाही सुशांतची माजी मॅनेजर होती. पण, सुशांतच्या मृत्यूच्या आठवडाभर आधी झालेल्या दिशाच्या मृत्यूमुळे सगळ्यांना अवाक् करुन ठेवलं होतं.
याविषयी दोघांच्या मृत्यू प्रकरणाविषयी सीबीआयनं तपास केला. त्यात सुशांत आणि दिशामध्ये केवळ ब्रँड बिल्डींग एक्सरसाईजविषयी चॅट झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे दिशाचा मृत्यू आणि सुशांतची आत्महत्या या दोन वेगवेगळ्या घटना असून दुर्दैवानं त्यांचा संबंध जोडण्यात आला असंही सीबीआयने म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.