१०० कोटी वसुली प्रकरणात मुंबईच्या दोन माजी पोलीस आयुक्तांची सीबीआयकडून चौकशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI inquiry two former Mumbai police commissioners 100 crore recovery case
१०० कोटी वसुली प्रकरणात मुंबईच्या दोन माजी पोलीस आयुक्तांची सीबीआयकडून चौकशी

१०० कोटी वसुली प्रकरणात मुंबईच्या दोन माजी पोलीस आयुक्तांची सीबीआयकडून चौकशी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांप्रकरणी सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि परम बीर सिंग यांची सोमवारी चौकशी केली आहे.मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात संजय पांडेना चौकशीसाठी तपास यंत्रणेनी बोलावले होते. ३० जून रोजी निवृत्त झालेल्या पांडे यांना काही दिवसांपूर्वी दोन सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्याबद्दल चौकशीचा सामना करावा लागत आहे.

आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एनएसई कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे रोखणे आणि एनएसई चे सिस्टम ऑडिट करताना सेबी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणे या आरोपांच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात देशमुख यांनी मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता.या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजे याला न्यायालयाने सदर खटल्यात माफीचा साक्षीदार बनण्याची परवानगी दिली आहे.

Web Title: Cbi Inquiry Two Former Mumbai Police Commissioners 100 Crore Recovery Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top