esakal | पुन्हा बँकेची फसवणूक, 97 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी CBI ने दाखल केला गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

पुन्हा बँकेची फसवणूक, 97 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी CBI ने दाखल केला गुन्हा

प्राप्त तक्रारीनुसार 2012 मध्ये 337 वाहनांच्या खरेदीसाठी 102 कोटींचे कर्ज घेण्यात आले होते

पुन्हा बँकेची फसवणूक, 97 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी CBI ने दाखल केला गुन्हा

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई, ता.24 : राष्ट्रीयकृत बँकेची 97 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच (CBI) ने नुकतीच सिद्धीविनायक लॉजीस्टीक मिमिटेड सह कंपनीचे प्रमोटर आणि  संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीनसह प्रमोटर रुपचंद बैद, संचालक लक्ष्मी देवी बैद, संचालक राजकुमार बैद, संचालक दिपककुमार बैद यांच्याविरोधात CBI ने गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाची बातमी : 50 लाखांची लाच घेणाऱ्या सायन हॉस्पिटलचे उपअधिष्ठाता राकेश वर्मा यांना अटक

प्राप्त तक्रारीनुसार 2012 मध्ये 337 वाहनांच्या खरेदीसाठी 102 कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. त्यासाठी वाणिज्य मालमत्ता आणि गाड्या तारण ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर 432 वाहने खरेदी केल्याची यादी बँकेला प्राप्त झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये पडताळणी केली असता एकच गाडी एकापेक्षा जास्त व्यक्तींना विकल्याचे दाखवून अधिक कर्ज घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

महत्त्वाची बातमी : बुधवार ठरला मुंबईतील आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस, तापमान 15.8 अंशापर्यत घसरले

तसेच सादर करण्यात आलेल्या 47 गाड्यांपैकी 27 गाड्यांची नोंदणी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ऑक्टोबर 2015 मध्ये हे खाते बुडीत निघाले. अखेर युनियन बँकेच्या तक्रारूवरून नुकताच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी डिसेंबर महिन्यात आंध्र बँकेची 89 कोटींची फसवूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.

मुंबईतील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा | Marathi news from Mumbai  

( संपादन - सुमित बागुल )

CBI lodged complained against promoters of logistic company siddhivinayak logistic

loading image