
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेकडून (सीबीआय) न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट आणि इतर आरोपींना मिळाली आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते सचिन सांवत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपने सुशांत सिंहच्या मृत्यूचे घाणेरडे राजकारण करुन मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे असा घणाघात त्यांनी एक्स पोस्ट द्वारे केला आहे.