esakal | CBSE च्या १०वीच्या निकालाची तारीख जाहीर

बोलून बातमी शोधा

CBSE च्या १०वीच्या निकालाची तारीख जाहीर

दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा नव्या पद्धतीने मिळणार गुण

CBSE च्या १०वीच्या निकालाची तारीख जाहीर
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने निकष जाहीर केले आहेत. विद्यार्थ्यांचे शाळेत अंतर्गत मूल्यांकन करून त्या आधारावर दहावीचे निकाल दिले जाणार आहेत. 20 जूनपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्याचे नियोजन CBSE कडून करण्यात आले आहे. देशभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन मे महिन्यात पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर 20 जूनपर्यंत निकाल जाहीर करण्याची तयारी केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्याचे शाळेत मूल्यांकन करण्यासाठी शाळेत मूल्यांकन समिती स्थापन केली जाणार असून त्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: ऑक्सिजन पुरवठ्याबद्दल राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

सध्या CBSE च्या प्रचलित धोरणांनुसार, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन हे 80 गुणांची लेखी परीक्षा आणि 20 गुणांची अंतर्गत मूल्यमापन परिक्षा या आधारा होते. यंदाही विद्यार्थ्यांचे मूल्यांकन 100 गुणांच्या आधारे होणार आहे. विद्यार्थ्यांचे 20 गुणांचे मूल्यांकन प्रचलित नियमांनुसार आतापर्यंत घेतलेल्या विविध परीक्षांच्या आधारे याचे गुणांकन करावे, असं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी मंडळाने वेगवेगळे निकष जाहीर केले आहेत. मंडळाने परीक्षा रद्द केल्याने 80 गुणांचे मूल्यांकन शाळांनीच करायचे आहे. हे मूल्यांकन शाळांनी वर्षभरात घेतलेल्या विविध परीक्षांच्या माध्यमातून करायचे आहे, असेही या पत्रकात सांगण्यात आले आहे. हे सर्व मूल्यांकन पूर्ण करून सर्व माहिती 11 जूनपर्यंत मंडळाला सादर करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: पुढच्या १५ दिवसात महाराष्ट्राला मिळणार २३ लाख लसींचे डोस

शाळेत स्थापन करण्यात येणाऱ्या मूल्यांकन समितीमध्ये मुख्याध्यापक आणि सात शिक्षकांचा समावेश असणार आहे. हे शिक्षक गणित, समाजशास्त्र, विज्ञान आणि दोन भाषा विषयांचे असावेत. दोन शिक्षक त्याच शाळेतील असणार आहेत. तर बाहेरील शाळांतील शिक्षकांना 2500 रुपये मानधन देण्यात येणार आहे. तर शाळेतील शिक्षकांना या कामासाठी 1500 रुपये मानधन देण्यात येणार आहे. या सर्वासाठीची सूत्रेही मंडळाने परिपत्रकात दिली आहेत. यामुळे निकालात समानता येणार आहे. समिती नियुक्तीपासून निकाल जाहीर करण्यापर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक देण्यात आले आहे. यानुसार 20 जून रोजी निकाल जाहीर करण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

असे असेल 80 गुणांचे विभाजन

चाचणी परीक्षा- 10 गुण

सहामाही परीक्षा- 30 गुण

सराव परीक्षा- 40 गुण