सर्वसामान्यांना सीबीएसईची दारे खुली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - बहुप्रतीक्षित सीबीएसई शाळेच्या शुभारंभाला महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. कोपरखैरणे आणि सीवूड्‌स येथे महापालिकेने उभारलेल्या भव्य इमारतींमध्ये उद्या (ता. 4)पासून या शाळा सुरू होणार आहेत. या शाळांमध्ये पहिल्या इयत्तेतील 60 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. सीबीएसईचे शिक्षण देणारी राज्यातील नवी मुंबई महापालिका पहिली ठरली असून, शहरातील शिक्षण क्षेत्रात ही नवी पहाट उगवल्याचे मानण्यात येते. 

गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेतर्फे नवी मुंबईत सीबीएसई शाळा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याकरिता सीवूड्‌स सेक्‍टर 50 आणि कोपरखैरणे येथे उभारलेल्या शाळा इमारतींची निवडही करण्यात आली होती; मात्र सीबीएसई शाळा चालवण्याचे अनुभव महापालिकेला नसल्यामुळे महापालिकेने त्यासाठी आकांक्षा सेवाभावी संस्थेची निवड केली आहे. दरम्यानच्या काळात त्याला सत्ताधाऱ्यांनी विरोध केल्यामुळे कोपरखैरणेतील शाळा महापालिका स्वतः चालवणार आहे, तर सीवूड्‌समधील शाळा आकांक्षा सेवाभावी संस्थेच्या वतीने चालवण्यात येणार आहे. 

सीवूड्‌स येथील शाळेत सुरुवातीला पहिल्या इयत्तेची शाळा सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सेवाभावी संस्थेतर्फे शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे त्यांना इमारत व फर्निचर अशा भौतिक सुविधा देण्यात येणार आहेत. 

सीवूड्‌स आणि कोपरखैरणेतील शाळांचे उद्‌घाटन महापौर जयवंत सुतार आणि आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील गरिबांच्या मुलांनाही सीबीएसई शिक्षणाची दारे खुली होणार आहेत. 

कोपरखैरणे आणि सीवूड्‌स येथे महापालिकेने उभारलेल्या इमारतींमध्ये सीबीएसई शाळा सुरू होत आहेत. समाजातील सर्व घटकांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर ऑगस्टअखेरपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवणार आहे. 
डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त, महापालिका 

पुढील वर्षी बालवाडी 
राजकीय आणि प्रशासकीय श्रेयाच्या हेव्यादाव्यांमुळे उशिराने सुरू झालेल्या सीबीएसई शाळेच्या पहिल्या वर्षात पहिली इयत्तेचे वर्ग सुरू झाले आहेत; मात्र पुढील वर्षी शाळेत बालवाडी, ज्युनिअर केजी आणि सिनियर केजी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. 

सीवूड्‌स सीबीएसई शाळा : पहिल्या इयत्तेच्या 22 विद्यार्थ्यांना प्रवेश 
कोपरखैरणे सीबीएसई शाळा : पहिल्या इयत्तेच्या 62 विद्यार्थ्यांना प्रवेश

Web Title: CBSE education that was the first in the state of Navi Mumbai Municipal Corporation