जलकुंभाभोवती सीसी टीव्ही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

मुंबई : कर्जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य टाकीभोवती संरक्षक कठडे नाहीत. येथे सुरक्षारक्षकही नसल्याने मद्यपी, गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे समाजकंटकांकडून पाण्याच्या टाकीत काही टाकण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कर्जत नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जलकुंभाभोवती सीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. 

कर्जत शहराला पाणीपुरवठा करणारे मुख्य जलकुंभ रेल्वेस्थानकालगतच्या उंच तहसील टेकडीवर आहे. या जलकुंभाचे झाकण उघडे असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. जलकुंभाचे क्षेत्र अस्वच्छ व असुरक्षित असल्याची माहिती मनसेने निवेदनाद्वारे प्रशासनाला दिली होती. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व जलकुंभाची पाहणी केली. 

ज्या जलकुंभाची दुरवस्था झाली होती, त्या सर्व जलकुंभांची माहिती दिल्यानंतरही प्रशासन त्यावर काम करण्यास दिरंगाई करत असल्याचे लक्षात येताच मनसेच्या शिष्टमंडळाने प्रशासनाची भेट घेत लेखी स्वरूपात निवेदन दिले. या वेळी जलकुंभांविषयी सर्वच समस्यांचा पाढा वाचत दहा दिवसांत तोडगा न काढल्यास मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाने पावले उचलत जलकुंभाभोवती सुरक्षेसाठी पाच सीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CC TV around the lake