
टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'स्मार्ट सिटी' योजनेअंतर्गत टिटवाळा शहरात बसवण्यात आलेले निम्मे सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या महिनाभरापासून बंद असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली ही यंत्रणाच कुचकामी ठरल्याने चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.