उल्हासनगरातील प्रमुख चौकात टीम ओमी कलानीच्या सीसीटीव्ही कॅमेरांचा वॉच

दिनेश गोगी
शुक्रवार, 27 जुलै 2018

ओमी कलानी यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेली टीमचे नगरसेवक भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. त्यात राजेश वधारिया, पंचम कलानी, रेखा ठाकूर, छाया चक्रवर्ती, लक्ष्मी सिंग, डिंपल ठाकूर, दीपा पंजाबी, शुभांगी निकम, आशा बिऱ्हाडे, सविता तोरणे-रगडे, सरोजिनी टेकचंदानी, रवी जग्यासी आदी  आसपास नगरसेवकांचा समावेश आहे.

उल्हासनगर - वाढलेली गुन्हेगारी, चैन स्नॅचिंगचे प्रकार, चोऱ्या यावर आळा बसवण्यासाठी उल्हासनगरातील प्रमुख चौकात टीम ओमी कलानीच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. त्याचे उद्घाटन रविवारी 29 जुलै ला होणार असून तसे पोस्टर्स-कटआऊट्स शहरात झळकले आहेत.

ओमी कलानी यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेली टीमचे नगरसेवक भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. त्यात राजेश वधारिया, पंचम कलानी, रेखा ठाकूर, छाया चक्रवर्ती, लक्ष्मी सिंग, डिंपल ठाकूर, दीपा पंजाबी, शुभांगी निकम, आशा बिऱ्हाडे, सविता तोरणे-रगडे, सरोजिनी टेकचंदानी, रवी जग्यासी आदी  आसपास नगरसेवकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीचे सतरामदास जेसनानी हे देखील ओमी कलानी यांच्यासोबत जुळले आहेत. उद्योगपती सुमित चक्रवर्ती, व्यापारी अजित माखिजानी,पितू राजवानी, पप्पू बहरानी तसेच प्रवक्ता कमलेश निकम, संतोष पांडे, अशोका फाऊंडेशनचे संस्थापक शिवाजी रगडे आदींची दमदार फळी ओमी सोबत आहेत, टीम ओमी कलानीचे जेव्हडेही नगरसेवक आहेत. त्यांच्या वॉर्डात सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरे लागणार असून त्यांना पालिकेच्या वतीने जो मासिक पगार मिळतो. त्यातून कॅमेरांची देखभाल केली जाणार असल्याचे ओमी कलानी यांनी सांगितले.

रविवारी 29 जुलै ला आमदार ज्योती कलानी यांच्या हस्ते प्रथम प्रमुख बाजारपेठेचे केंद्र असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिसिटीव्ही कॅमेराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पुढे कॅम्प नंबर 5 मधील चालिया मंदीर येथे कॅमेरे बसवले जाणार आहेत. टीम ओमी कलानीच्या वतीने सुरक्षित उल्हासनगर या नावाखाली ही मोहीम नागरिकांच्या सुरक्षतेसाठी राबवण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे कंट्रोल हे डीसीपी ऑफिस मधून होणार असल्याची माहिती ओमी कलानी यांनी दिली.

Web Title: CCTV cameras at ulhasnagar