गणेशपुरीत सिमेंट-काँक्रीट रस्त्यातील गटारी धोकादायक अवस्थेत

vajreshwari
vajreshwari

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र गणेशपुरी येथील गावदेवी ते गांधीपाडा दरम्यानचा रस्ता पूर्ण झाला असून, या रस्त्याच्या ठेकेदाराने गटारी अपूर्ण अवस्थेत सोडून देखील आपले बिल पास करून घेतले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी या तीर्थक्षेत्री गांधीपाडा ते गावदेवी दरम्यान सखलभाग असल्याने 100 मीटर लांबीचा सिमेंटकाँक्रीट रस्तासाठी रु.25 लाख जिल्हा परिषद मार्फत मंजूर करन्यात आले होते. संबंधीत ठेकेदाराने सदर रस्त्याच्या गटारीचे काम अपूर्ण अवस्थेत ठेवले असून गटारीची झाकणे न बसविल्याने येणाऱ्या जाणाऱ्या पादचारी च्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणावरून प्रवास करताना एखाद्या शालेय विद्यार्थ्यांना समोरून वाहन आल्यास त्याच धोकादायक गटारीचा आधार घ्यावा लागतो.व सदर गटारी उघडे असल्याने यात तोल जाऊन पडण्याची शक्यता आहे मात्र असे असतांना काम अपूर्ण अवस्थेत असून देखील संबंधित विभागाने या रस्त्याच्या ठेकेदारास पूर्णत्वाचा दाखला दिलाच कसा? असा आरोप येथील मनसे विभाग अध्यक्ष सुनिल देवरे यांनी केला आहे. दरम्यान या बाबत पं.स.भिवंडी चे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता दत्तू गीते यांना या विषयावर विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली. या बाबत सदर रस्त्यालगतच्या गटारीचे काम त्वरित पूर्ण करावे व न केल्यास आंदोलनाचा इशारा येथिल मनसे विभाग अध्यक्ष सुनिल देवरे व शाखा अध्यक्ष दीपक पुजारी यांनी लेखी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता ठाणे यांना दिला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com