
मुंबई : गणेशोत्सव सण महिनाभरावर आला असून या पार्श्वभूमीवर कोकणला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. उत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या पाहता मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य रॅल्वेने गणेशोत्सवनिमित्त जाडा गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. यामुळे कोकणवासियांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे.