मध्य, पश्चिम रेल्वेला पावसामुळे 85 कोटीचा तोटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

मुसळधार पावसामुळे आता पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेचे 85 कोटीचे नुकसान झाले आहे.  मध्य रेल्वेच्या घाट विभागात दरडकोसळण्याच्या घटनामुळे अनेक मेल,एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यांत आल्या आहे. त्याबरोबर मध्य रेल्वेची प्रवासी आणि मालवाहतुकीला मोठा फटका बसला असून रेल्वेला दररोज पाच कोटींचे नुकसान होत आहे. यामध्ये मध्य रेल्वेला 75 तर पश्चिम रेल्वेचा 10 कोटींचा तोटा झाला आहे.

मुंबई - मुसळधार पावसामुळे आता पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेचे 85 कोटीचे नुकसान झाले आहे.  मध्य रेल्वेच्या घाट विभागात दरड कोसळण्याच्या घटनामुळे अनेक मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याबरोबर मध्य रेल्वेची प्रवासी आणि मालवाहतुकीला मोठा फटका बसला असून रेल्वेला दररोज पाच कोटींचे नुकसान होत आहे. यामध्ये मध्य रेल्वेला 75 तर पश्चिम रेल्वेचा 10 कोटींचा तोटा झाला आहे.

गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे सर्वाधिक लोणावळा ते कर्जत दरम्यान दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी मुंबई - पुणे रेल्वे मार्ग रविवारी 11 जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. 3, 4 ऑगस्टला 368 मेल एक्स्प्रेस, 44 पेसेंजर आणि 1646 लोकल गाड्या बंद करण्यात आल्या होत्या.

यामध्ये 35. 61 कोटी रुपये मध्य रेल्वेला नुकसान झाले होते. त्याच बरोबर मुंबई- पुणे मार्गवरील मालगाडी बंद असल्यामुळे रेल्वे दररोज 5 कोटी रुपयाचे नुकसान होत आहे. यामध्ये 1 ऑगस्ट ते आतापर्यत 40 कोटी रुपये नुकसान झाले असून आतापर्यत मध्य रेल्वेला 75 कोटी रुपयाचे  नुकसान झाले आहे. तर पश्चिम रेल्वेवर 31 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीत एकूण 365 गाड्या रद्द करण्यात आला. त्यामुळे 2 लाख 83 हजार 555 प्रवाशाना तिकीट परतावा म्हणून 10.12 कोटी रुपयांचे नुकसान झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central and Western Railway Loss by Rain