varsha gaikwad
varsha gaikwad

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या 'या' मागणीला केराची टोपली; केंद्र सरकारकडून दूरदर्शनची वेळ मिळेना

मुंबई:  विद्यार्थ्यांना डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षण पुरवण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वेळोवेळी केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे दूरदर्शनची वेळ मिळावी, यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र शिक्षण मंत्र्यांच्या पत्राला केंद्र सरकारकडून केराची टोपली दाखवली जात आहे असं वर्षा गायकवाड यांनी म्हंटलंय. 

आपण अनेकदा दूरदर्शनसाठी पत्रव्यवहार करत असून आपल्याला त्यासाठी दाद मिळाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही त्यासाठी विनंती केली होती. परंतु अद्याप आपल्याला प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी  पत्रकार परिषदेत दिली. 

यामुळेच आपण टाटा स्काय आणि जिओ या खाजगी कंपन्यांच्या चॅनलचा पर्याय निवडला असल्याचे त्या म्हणाल्या. राज्यात कालपासून शैक्षणिक सत्राला सुरू झाली असून त्यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद आयोजित करून राज्यभरात सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाची माहिती दिली.

जुलैमध्ये नववी आणि दहावीचे वर्ग प्रत्यक्षात सुरू होत असून त्यासाठी आम्ही या वर्गाची पुस्तके बाजारात उपलब्ध केली आहेत. तसेच ही पुस्तके ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 

ऑनलाईन शिक्षणासाठी राज्यभरात दीक्षा या अँपचा वापर चांगला होतोय, ज्या ठिकाणी स्मार्ट फोनचा वापर होत नाही, त्यांच्यासाठी पर्याय आणत आहोत. रेड झोन मधील शाळा आम्हाला आताच सुरू करायच्या नाहीत, पण ग्रामीण भागात आम्ही  त्या सुरू करणार आहोत. कोणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणासाठी पालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहोत. मुलांचे आयुष्य महत्त्वाचे आहे, त्यांचे शिक्षण महत्त्वाचे आहे, त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी काही आम्ही सुरुवातील ऑनलाइन शिक्षण आणत आहोत. 

यासाठी राज्यातील सर्व तज्ञ आणि पालक संघटनांशी आम्ही सर्वांची चर्चा केली असल्याची माहिती त्यांनी दिली. दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीचा विषय आणला जाईल, मात्र तोपर्यंत आत्ता बारावीचा अभ्यासक्रम बदलला, त्याच्या ऑनलाइन अभ्यासक्रमाची तयारी सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

central government has ignored state education ministers seek 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com