बापरे! 3 चीनी कंपन्यांच्या मदतीनं 'त्यानं' केले तब्बल 30 लाख कॉल्स; बेकायदा टेलिफोन एक्सचेंज प्रकरणात माहिती उघड.. 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

गोवंडी येथील बेकायदा टेलिफोन एक्सचेंज तीन चीनी कंपनींच्या मदतीने चालू असल्याची माहिती आता गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या बेकायदा टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून 30 लाख दूरध्वनी करण्यात आले

मुंबई: गोवंडी येथील बेकायदा टेलिफोन एक्सचेंज तीन चीनी कंपनींच्या मदतीने चालू असल्याची माहिती आता गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या बेकायदा टेलिफोन एक्सचेंजच्या माध्यमातून 30 लाख दूरध्वनी करण्यात आले असून सरकारचा 20 कोटी रुपयांचा महसूल बुडवण्यात आला आहे. हेरगिरीसाठी या यंत्रणेचा वापर झाला का, याबाबत पडताळणी सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

समीर अलवारी(38) असे अटक याला याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणातील दहशतवादी, आर्थिक या सर्व बाजूंनी पोलिस तपास करत आहेत. आरोपी सराईत असून त्याच्या संबंधीत इतर माहितीही घेण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा एकमेकांशी समन्वय ठेऊन आहेत. आरोपीबाबतची माहिती जम्मू काश्मिर पोलिस व लष्करी गुप्तचर विभागाला मिळाली. 

हेही वाचा: पालघर प्रकरणातील २३ आरोपींना ठेवण्यात आलेलं वाडा पोलिस ठाणेच बंद करायची आली वेळ, कारण...

त्यानुसार तीन दिवसांपूर्वी ही माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना देण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून पोलिस  तीन दिवसांपासून संशयीत आरोपीचा शोध घेत होते. एका खासगी मोबाईल नेटवर्क कंपनीच्या मदतीने तपास केला असता हे दूरध्वनी गोवंडी परिसरातून येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गोवंडी येथे छापा टाकून समीरला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 223 सीमकार्ड व पाच सीमबॉक्स हस्तगत करण्यात आले. 

याबाबत अधिक तपास केला असता आखाती देश व पाकिस्तानातून दूरध्वनी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. परदेशी दूरध्वनी अथवा व्हिओआयपी दूरध्वनी या बेकायदा एक्‍स्चेंजच्या माध्यमातून वळवले जातात. सिम बॉक्‍स आणि इंटरनेटच्या माध्यमातून सर्व्हरवर घेऊन हे कॉल संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवले जात असल्याने त्यांची नोंदही होत नव्हती. तसेच ज्या व्यक्तीला दूरध्वनी केले जातात त्याला भारतीय मोबाईल क्रमांकावरून दूरध्वनी आला असल्याचे वाटायचे.

हेही वाचा: अरे वाह! पत्रकारांनाही मिळणार लोकलची सुविधा; मुख्य सचिव अजोय मेहता यांचे आश्वासन 

 त्यामुळे या बेकायदा यंत्रणेचा वापर करून पाकिस्तानी यंत्रणांनी भारतीय लष्करी तळांमधील माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे का? याबाबत तपास सुरू आहे.

man did 30 lac calls with help of 3 china based companies 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man did 30 lac calls with help of 3 china based companies