

mumbai slum area
ESakal
बापू सुळे
मुंबई : राज्य सरकारकडून राबवल्या जात असलेल्या ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ या महत्त्वाकांक्षी योजनेला केंद्र सरकारने सुरुंग लावला आहे. मुंबईत १३ लाखांहून अधिक झोपड्या असून त्यापैकी जवळपास एक लाख ४१ हजार झोपड्या केंद्र सरकारच्या जागेवर आहेत. या ठिकाणी पुनर्वसन प्रकल्प राबवून मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी ‘एसआरए’ प्राधिकरण प्रयत्नशील असले तरी त्याकरिता केंद्र सरकारकडून ‘एनओसी’च (ना हरकत प्रमाणपत्र) दिली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.