Mumbai Local: लोकलखाली अडकल्या म्हशी, मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत; म्हशी काढण्याचे प्रयत्न सुरू
Mumbai Local Train: वांगणी-बदलापूर दरम्यान लोकल ट्रेनखाली दोन म्हशी अडकल्याची घटना घडली. यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांचे हाल होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलबाबत अपडेट समोर आली आहे. लोकल खाली दोन म्हशी अडकल्याची घटना घडली असून यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी गेल्या तासाभरापासून रेल्वे वाहतूक सेवा खोळंबली असून प्रवाशांचे हाल होत आहे.