कोरोनाच्या सावटात रामदास आठवले म्हणतायत, "आता महाराष्ट्रात चालणार नाहीत नखरे"

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

रामदास आठवले यांनी खास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक कविता केलीये. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे कोरोनाला फार नखरे करता येणार नाही असं रामदास आठवले म्हणतायत.

मुंबई - जगभरात कोरोनामुळे नागरिकांची चिंता वाढलीये. इटली, स्पेन, इंग्लंड, UAE, सौदी अरेबिया, उत्तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया सगळीकडेच कोरोनामुळे बिकट परिस्थिती आहे. अशात भारतातून आणि खरंतर महाराष्ट्रातून एक नारा पुढे आला तो म्हणजे "गो कोरोना, कोरोना गो..." केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हा नारा दिला, हा नारा प्रचंड व्हायरल झाला आणि जगभरात पोहोचला. यावर ट्रोलिंग झालं पण अनेकांनी याला पॉझिटिव्हली देखील घेतलं. 

सावधान ! महाराष्ट्रात एका दिवसात वाढलेत ११ कोरोना रुग्ण; अजूनही बाहेर पडत असाल तर आत्ताच थांबा..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि RPI चे नेते रामदास आठवले यांनी अनेक कविता देखील केल्यात. त्या कविता देखील प्रचंड व्हायरल झाल्यात. भारतातील सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा सर्वाधिक आहे. आज दिनांक २१ मार्च रोजी दुपारी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्सची संख्या ५२ वरून थेट ६४ वर गेलीये. या सर्व कठीण परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारंवार माध्यमांसमोर येतायत, महाराष्ट्रातील कोरोना आणि एकंदर सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन माहिती देतायत. अशात कोरोनाच्या पार्शवभूमीवर सरकारकडून मोठी खबरदारी घेतली जातेय.

अशात रामदास आठवले यांनी खास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक कविता केलीये. महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे कोरोनाला फार नखरे करता येणार नाही असं रामदास आठवले म्हणतायत. 

अशा लोकांना काय बोलावं; थायलंडहून परतले, अन्‌ कच्छ एक्‍स्प्रेसने केला धोकादायक प्रवास...

"कोरोनाला महाराष्ट्रात करता येणार नाहीत नखरे 
कारण त्याचा सामना करतायला आहेत उद्धव ठाकरे.."

ऐका पूर्ण कविता..

 

central minister and RPI leader ramadas athawale made corona poem on uddhav thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central minister and RPI leader ramadas athawale made corona poem on uddhav thackeray