सावधान ! महाराष्ट्रात एका दिवसात वाढलेत ११ कोरोना रुग्ण; अजूनही बाहेर पडत असाल तर आत्ताच थांबा..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

म्हणजेच मागील २४ तासात महाराष्ट्रात एकूण ११ कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ११ पैकी १० कोरोना COVID19 पॉझिटिव्ह केसेस या मुंबईतील आहे

मुंबई - कोरोनाचा विळखा भारतावर आणि त्यातही महाराष्ट्र्रात अधिक घट्ट होत चाललाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. अशात आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बातमी महाराष्टरची चिंता वाढवणारी आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा कालचा ५२ वरील आकडा आज ६३ वर गेलाय. म्हणजेच मागील २४ तासात महाराष्ट्रात एकूण ११ कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ११ पैकी १० कोरोना COVID19 पॉझिटिव्ह केसेस या मुंबईतील आहेत. त्यामुळे करोनानं राज्यात निर्माण झालेलं संकट अधिक गहिरं होताना पाहायला मिळतंय.   

हेही वाचा: #COVID-१९;  घाबरू नका ! कोरोनाला निष्प्रभ करण्यासाठी प्रयत्न सुरु... 

आज सकाळी महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती स्टेज २ वर असल्याचं राजेश टोपे यांनी नमूद केलंय. गेल्या २४ तासात वाढलेल्या ११ COVID19 पॉझिटिव्ह केसेस पैकी ८ जण परदेशातून कोरोना लागण घेऊन भारत आल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलंय. तर इतर तिघांना संसर्गातून कोरोनाची लागण झालीये. 

हेही वाचा: #COVID-१९;  घाबरू नका ! कोरोनाला निष्प्रभ करण्यासाठी प्रयत्न सुरु... 

मुंबई MMR, पुणे , पिंपरी चिंचवड आणि नागपुरातील सर्व सर्व खासगी कार्यालयं बंदच झाली पाहिजेत, दरम्यान सदर कारवाई करताना आपण घाई गडबड करून चालणार नाही. या व्यतिरिक्त राज्यातील सर्व महानगर पालिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत दिली गेलीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  ही रक्कम वापरात येणार आहे, असं देखील राजेश टोपे म्हणालेत.  

दरम्यान, मुंबई महानगरातील लोकात ट्रेनच्या गर्दीवर देखील राजेश टोपे यांनी भाष्य केलंय. मुंबई महानगरातील गर्दी अशीच राहिली तर मात्र मुंबईची लाईफ लाईन बंद करावी लागेल असं पुन्हा एकदा राजेश टोपे यांनी म्हटलंय.

11 new corona positive cases in maharashtra 10 from mumbai maharashtra count goes on 63 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 new corona positive cases in maharashtra 10 from mumbai maharashtra count goes on 63