Central Minister Kapil Patil : तीन काय तीस पक्ष एकत्र आले तरी भाजपला गाडण्याची ताकद कोणात नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातीलच नाही तर जगातील जनतेने स्विकारले आहे. देशात पुन्हा एकदा मोदी यांचे सरकार बनेल तेही आत्तापेक्षा जास्त जागा जिंकून बनेल.
Central Minister Kapil Patil
Central Minister Kapil PatilSakal

डोंबिवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातीलच नाही तर जगातील जनतेने स्विकारले आहे. देशात पुन्हा एकदा मोदी यांचे सरकार बनेल तेही आत्तापेक्षा जास्त जागा जिंकून बनेल. अशा भाजपला गाडण्याची ताकद 3 काय 30 पक्ष एकत्र आले तरी कोणामध्ये नसेल. आमचा नेता ठरलेला आहे हे सर्व एकत्र आले तरी यांना यांचा नेता ठरवता आलेला नाही.

मुंबईत परिषद झाली त्याचे संयोजक ठाकरे होते. प्रधानमंत्रीच्या खूर्चीवर बसण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ममता बॅनर्जी यांना आयएनडीआयए बैठकीत बसायला खूर्ची मिळाली नाही आणि त्या रागात निघून गेल्या.

अशी परिस्थिती आयएनडीआयएची आहे. त्यांनी मोदीना काढण्याची स्वप्न पाहू नये असा टोला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याण येथे एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

कल्याण पश्चिमेत भाजप तर्फे पदनियुक्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे सुपूत्र वैभव गायकवाड यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच पक्षातील इतर पदांचे वाटप यावेळी केंद्रीय मंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना इंडियाचा उल्लेख आयएनडीआयए असा केला. तुम्हाला गाडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला होता.

यावर बोलताना कपिल पाटील यांनी ठाकरे यांना वरील टोला लगावला. यांनी मोदीजींना काढण्याची स्वप्न बघू नये, मोदींना देशातल्या जनतेने स्वीकारलेल्या आहे, त्या जनतेचा त्यांना आशीर्वाद आहे त्यांचं 2024 मध्ये कोणीही काही करू शकणार नाही आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा जास्त संख्येने जिकूंन येणार असे पाटील म्हणाले.

हमासला समर्थन करणारे लोक त्याच्य सोबत आहेत, काँग्रेसने हमासला समर्थन केले - कपिल पाटील

गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूवर फुलांचा वर्षाव भाजप कडून केला जातो. तर मी समाजवाद्याशी कां बोलू नये असे उद्धव ठाकरे म्हणाले आणि त्याला उत्तर देत पाटील यांनी सांगितले की समाजवाद्यांशी बोलायला त्यांना कोणी मनाई केली आहे. ते काय काय बोलतात याच्यावर मी भाष्य करायला एवढा सक्षम माणूस नाही. मी भाजपचा सामान्य कार्यकर्ता आहे.

आपल्या सगळ्यांना माहित आहे की या राज्यामध्ये काय चाललं आहे. बाळासाहेबांचे काय विचार होते आत्ताचे शिवसेनेचे काय विचार आहेत. हे सगळ्यांना माहित आहे. त्याच्यावर बोलून काय फायदा. मी काही काल मॅच पाहिली नाही, त्यामुळे मला माहित नाही फुलांचा वर्षाव झाला की नाही.

पण एक निश्चित आहे, की भारतीय संघाने जो विजय मिळवला तो विजय इतका महत्त्वाचा आणि दमदार आहे की इस्रायल चे जे राजदूत आहेत त्यांनी सांगितलं की आता हमासला समर्पित करायला यांना संधी मिळाली नाही. म्हणजे हमासला समर्पित करणाऱ्या लोकांचा समर्थन करणारे त्यांच्या सोबतही आहेत असं समजा काँग्रेसने हमासला समर्थन केलं ते त्याच्या सोबत आहेत असे पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com