

AC Local Fake Ticket
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेत बनावट तिकिटांची घटना पुन्हा उघडकीस आली आहे. एसी लोकलमध्ये तिकीट तपासणीदरम्यान मध्य रेल्वेचे तिकीट परीक्षक प्रशांत कांबळे यांनी आणखी तीन प्रवाशांना बनावट यूटीएस जनरेटेड सीझन तिकिटांसह पकडल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारचा पर्दाफाश झाल्यानंतर हा नवा प्रकार समोर आला आहे.