
Central Railway Megablock
ESakal
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर ४ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. आजपासून म्हणजेच शनिवार (ता. ११) ते मंगळवार १४ ऑक्टोबर दरम्यान मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार असून वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.