Central Railway Mega Block : मेगा ब्लॉकचा मेल-एक्सप्रेसच्या प्रवाशांना सर्वाधिक फटका; मुंबई गाठण्यासाठी अतोनात हाल

उन्हाळ्याचा सुट्ट्या आणि लग्न सराईसाठी गावी गेलेले प्रवासी आता कुटुंबासोबत मुंबईत परतू लागले आहेत.
Central Railway Mega Block
Central Railway Mega Blockesakal
Summary

मेगॉब्लॉकमुळे अनेक प्रवाशांना पर्यायी रेल्वे गाड्यांतून जनरल डब्यातून प्रवास करावा लागला आहे.

मुंबई : उन्हाळ्याचा सुट्ट्या आणि लग्न सराईसाठी गावी गेलेले प्रवासी आता कुटुंबासोबत मुंबईत परतू लागले आहेत. परतीच्या प्रवासासाठी या प्रवाशांनी चार महिन्यापूर्वी मेल-एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण केले होते. परंतु, मध्य रेल्वेच्या महा मेगाब्लॉकने (Central Railway Mega Block) त्यांच्या परतीचा प्रवास कठीण करुन टाकला. ब्लॉकमुळे अनेक मेल-एक्सप्रेस गाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक आणि पुणेला शॉर्टटर्मिनेट केल्यामुळे मुंबई गाठतांना या प्रवाशांना हाल सहन करावे लागले. शिवाय, आर्थिक भुर्दंडही बसला.

ठाणे स्थानकांच्या फलाट रुंदीकरणाच्या कामासाठी ६३ तासांचा मेगाब्लॉक तर दुसरीकडे सीएसएमटीच्या १०,११ फलाटांच्या विस्तारीकरणांच्या कामासाठी ३६ तासांचा ब्लॉक सुरु झाला. या दोन्ही ब्लॉकचा सर्वात जास्त फटका लांब पल्लाच्या गाड्यांवर झाला आहे. या दोन्ही ब्लॉकमुळे एकूण ७२ मेल- एक्सप्रेस गाड्या (Express trains) रद्द करण्यात आल्या तर, अनेक मेल- एक्सप्रेस गाड्या दादर, ठाणे, पनवेल,नाशिक आणि पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.

उन्हाळ्याचा सुट्ट्या, लग्न समारंभासाठी मार्च आणि एप्रिल महिन्यात गावी गेलेले प्रवासी मुंबईत परतू लागले होते. त्यातच दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल लागल्यानंतर मुलांच्या प्रवेशासाठी कुटुंब मुंबईत येत आहेत. मात्र मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे या प्रवाशांना परतीच्या प्रवासात प्रचंड हाल सहन करावे लागले आहेत.

Central Railway Mega Block
'आव्हाडांनी आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान केलाय, त्यांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल'; मुश्रीफांची सडकून टीका

अतोनात हाल

उन्हाळ्यात मेल-एक्सप्रेस गाड्यांचे आरक्षण मिळणे कठीण असते. त्यामुळे प्रवासाचे नियोजन चार महिन्यापूर्वी करतात. मात्र मेगॉब्लॉकमुळे अनेक प्रवाशांना पर्यायी रेल्वे गाड्यांतून जनरल डब्यातून प्रवास करावा लागला आहे. नाशिक, पुण्यावरुन मुंबईला येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना पर्यायी मार्ग शोधून प्रवास करावा लागत आहे.

कोकणवासीयांचे हाल

ब्लॉकमुळे मांडवी आणि कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेल रेल्वे स्थानकापर्यंत धावत आहे. त्यामुळे पनवेलमधून मुंबई गाठण्यासाठी प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. त्यातच हार्बर मार्गावरील लोकल सेवा शनिवारी वडाळ्यापर्यंत धावत आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दीचा सामना करावा लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. पनवेलवरुन मुंबई गाठण्यासाठी अनेक प्रवाशांनी खासगी वाहने घेतली. त्यामुळे अतिरिक्त पैशाचा भुर्दंड सहन करावा लागतोय.

Central Railway Mega Block
मिरजेचा लाचखोर अभियंता सलगरकरकडे कोटींचे घबाड; सव्वादोन किलो सोन्यासह रोकड जप्त, परळीत मोठी कारवाई

मेगाब्लॉकला आमचा विरोध नाही. परंतु,याची माहिती मेल-एक्सप्रेसच्या प्रवाशांना दीड ते दोन महिन्या अगोदर देणे गरजेची होती. काही दिवसांपूर्वी ब्लॉकची घोषणा केल्यामुळे मेल- एक्सप्रेसच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

-अक्षय महापदी, सदस्य कोकण विकास समिती

या ब्ल़ॉकचा सर्वाधिक फटका मेल- एक्सप्रेसच्या प्रवाशांना बसला आहे. या प्रवाशांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते.

-सुभाष गुप्ता,अध्यक्ष रेल यात्री परिषद

या काळात केवळ उपनगरीय प्रवाशांसाठ पर्यायी व्यवस्था करण्यात आली. परंतु, मेल- एक्सप्रेस गाड्यांतून येणाऱ्या प्रवाशांचा विचारच झाला नाही.

-नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी महासंघ

रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे लांब पल्याच्या रेल्वे गाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला आहे. मध्य रेल्वेने या प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावीत.

-हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी गृ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com