'आव्हाडांनी आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान केलाय, त्यांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल'; मुश्रीफांची सडकून टीका

आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडून त्यांचा अपमान केला आहे.
Hasan Mushrif vs Jitendra Awhad
Hasan Mushrif vs Jitendra Awhadesakal
Summary

‘याप्रकरणी आमचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आव्हाडांची पाठराखण करायच्या नादात डॉ. आंबेडकर यांचा अपमानच विसरले.'

कागल : ‘आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा फोटो फाडून त्यांचा अपमान केला आहे. संपूर्ण देशवासीयांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावलेल्या आहेत. आव्हाड यांनी कितीही माफी मागितली तरी त्यांचे हे कृत्य पुसले जाणार नाही. त्यांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल’, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘याप्रकरणी आमचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आव्हाडांची पाठराखण करायच्या नादात डॉ. आंबेडकर यांचा अपमानच विसरले. भुजबळ यांनी आव्हाडांना खडे बोल सुनावायला पाहिजे होते. त्यांचे हे कृत्य अत्यंत चुकीचे आहे, असे ठणकावून सांगण्याची गरज होती, अशी अपेक्षा मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

Hasan Mushrif vs Jitendra Awhad
Pune Porsche Accident : शरद पवारांना सोडून गेलेल्या मुश्रीफांनी मला दम दिलाय, पण मी..; आमदार धंगेकरांचा थेट इशारा

ते पुढे म्हणाले, ‘गेल्या आठवड्यातच मुंबईत पक्षाच्या बैठकीत अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचे (Manusmriti) धडे येत असल्याचा उल्लेख करीत भुजबळ यांनी हा विषय काढला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की, ‘अभ्यासात येऊ घातलेल्या मनुस्मृतीच्या धड्याला आपला कडाडून विरोधच असेल.’’ या पार्श्वभूमीवर निव्वळ राजकारण करायचे म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी महाडमध्ये चवदार तळ्यावर हा विकृत प्रकार केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com