मिरजेचा लाचखोर अभियंता सलगरकरकडे कोटींचे घबाड; सव्वादोन किलो सोन्यासह रोकड जप्त, परळीत मोठी कारवाई

घराच्या झाडाझडतीनंतर त्याच्या बँकेच्या लॉकरमध्येही मोठी ‘माया’ सापडली आहे.
Irrigation department engineer Rajesh Salgarkar
Irrigation department engineer Rajesh Salgarkaresakal
Summary

परळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकरला २८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती.

बीड : धरणातील माती शेतात टाकण्यासाठी सात शेतकऱ्यांकडून २८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाटबंधारे विभागाचा (Irrigation Department) कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याला पकडण्यात आले होते. त्याच्या घराच्या झाडाझडतीनंतर त्याच्या बँकेच्या लॉकरमध्येही मोठी ‘माया’ सापडली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Bribery Department) पथकाने शुक्रवारी (ता. ३१) सलगरकरच्या मिरज (जि. सांगली) येथील युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेतील लॉकरची झडती घेतली. यावेळी तब्बल सव्वादोन किलो सोने व रोख रक्कम असे पावणेदोन कोटी रुपयांचे घबाड मिळाले.

२२ मे रोजी माजलगाव पाटबंधारे विभागाचा (Majalgaon Irrigation Department) परळी येथील कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकरला २८ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. त्याने चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याची परवानगी देण्यासाठी शेतकऱ्यांकडून लाच घेतली होती.

Irrigation department engineer Rajesh Salgarkar
Pune Porsche Accident : शरद पवारांना सोडून गेलेल्या मुश्रीफांनी मला दम दिलाय, पण मी..; आमदार धंगेकरांचा थेट इशारा

त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या अंबाजोगाईतील भाड्याच्या घराची झडती घेतली होती. त्यावेळी ११ लाख ७८ हजार रुपये रोख, तीन तोळे सोने व तीन किलो वजनाचे चांदीचे ताट, ग्लास, तांब्या व समई आदी वस्तू आढळल्या होत्या. यानंतर मिरज येथे जाऊन त्याच्या मूळ घरीही तपासणी करण्यात आली.

Irrigation department engineer Rajesh Salgarkar
'आव्हाडांनी आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान केलाय, त्यांना प्रायश्चित्त घ्यावेच लागेल'; मुश्रीफांची सडकून टीका

मिरजेत खळबळ

‘एसीबी’चे पथक आज सलगरकरला घेऊन मिरजला आले. तिथे सुरुवातीला त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यानंतर त्याच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या मिरज शाखेतील लॉकरची तपासणी केली. यामध्ये रोख ११ लाख ८९ हजार रुपये, दोन किलो १०५ ग्रॅम सोने (१११४ ग्रॅम वजनाची बिस्किटे) व ९९१ ग्रॅमच्या इतर दागिन्यांचा समावेश आहे. या झडतीमध्ये तब्बल एक कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केला. या कारवाईत पोलिस निरीक्षक युनूस शेख, सुरेश सांगळे, अविनाश गवळी, भरत गारदे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, स्नेहलकुमार कोरडे यांचा सहभाग होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com