

Mumbai Local Train Megablock
ESakal
मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी (ता. १९) मुख्य लाइन आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार असून काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे. लोकल प्रवाशांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशांनाही याचा फटका बसणार आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गावर रविवारी दिवसा जम्बो ब्लॉक नसल्याने लोकल नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत.