

Central Railway Megablock
ESakal
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर पुनर्विकास कामासाठी ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत अनेक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळावतर्क पाहूनच प्रवासाचं नियोजन करा, असे आवाहन कऱण्यात आले आहे.