
Mumbai Local Megablock
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेच्या कर्जत यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी २२, २३ आणि २४ सप्टेंबरला विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात कर्जत ते खोपोली-नेरळ मार्गावरील सर्व उपनगरी सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहेत. त्याचबरोबर काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाईल, तर काही गाड्या वळविण्यात येणार आहेत.