
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे १५ डब्यांच्या लोकल ट्रेनसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. प्लॅटफॉर्म ५ आणि ६ च्या विस्तारासाठी अडथळा ठरणारी जुनी रूट रिले इंटरलॉकिंग (RRI) इमारत पाडली जाणार आहे. या निर्णयामुळे १५ डब्यांच्या लोकल ट्रेनच्या सेवांमध्ये दुप्पट वाढ होणार असून, प्रवाशांना अधिक सोयीसुविधा मिळणार आहेत.