

Central Railway
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेने उपनगरीय लोकल वाहतुकीचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मोठी पावले उचलली आहेत. कल्याण ते कर्जत या दरम्यान असलेली दहा लेव्हल क्रॉसिंग गेट्स कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून, त्यांच्या जागी नवे रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे या मार्गावरील गाड्यांच्या वेगात लक्षणीय वाढ होणार असून, लोकल गाड्यांच्या वक्तशीरपणा सुधारण्यास मदत होणार आहे.