

Central Railway 15-coach Local Train
ESakal
मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, यामुळे ट्रेनमध्ये नेहमीच मोठी गर्दी दिसून येते. या गर्दीमुळे प्रवाशांमध्ये होणारी धक्काबुक्की आणि वादाच्या घटना कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने १५ डब्यांच्या २२ लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.