रेल्वेच्या गोंधळात तिघांचा मृत्यू, एकाने एसी लोकलच्या धडकेत गमावला जीव; तर घाटकोपर-विक्रोळीदरम्यान दोन मृतदेह

Mumbai Local Train Accident: मुंबईतील रेल्वे मार्गावर तीन मृत्यूंच्या घटना समोर आल्या आहेत. एसी लोकलच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला, तर घाटकोपर-विक्रोळी दरम्यान दोन मृतदेह आढळल्याची माहिती आहे.
Mumbai Local Train Accident

Mumbai Local Train Accident

ESakal

Updated on: 

मुंबई : मध्य रेल्वेच्या विस्कळीत लोकल सेवेदरम्यान सोमवारी तीन घटना समोर आल्या. भांडुप स्थानकात एसी लोकलच्या धडकेत २१ वर्षीय साहिल थिटे या तरुणाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, घाटकोपर आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान दोन मृतदेह आढळले. तसेच, लोकलला विलंब होत असल्याने रेल्वे रुळांवरून चालत जाणारे दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com