

mumbai local
esakal
मुंबई : भाऊबीजनिमित्त भाऊ-बहिणींच्या भेटीगाठींसाठी मुंबईकरांची लगबग सुरू असताना बुधवारी (ता. ११) दिवा रेल्वे फाटकावरील वाहतूक कोंडीने प्रवाशांचे नियोजन बिघडवले. रस्त्यावरील वाहनांची गर्दी हटत नसल्याने दुपारी १.३५ ते १.५३ या वेळेत तब्बल १८ मिनिटे फाटक उघडेच राहिले. त्यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय वाहतूक विस्कळित झाली. नऊ लोकल आणि सहा मेल-एक्स्प्रेस गाड्या रखडल्या, तर एकूण सुमारे ३० गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. ऐन सणाच्या दिवशी झालेल्या या खोळंब्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.