दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती | Railway update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

express

दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : मध्य रेल्वेने (central railway) गाडी क्रमांक 01015 दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेसच्या (Diva-sawantwadi express) दिवा येथून सुटण्याच्या वेळा गुरुवारी, (ता.25) रोजीपासून बदलण्याचा निर्णय (timetable changes) घेतला आहे. ही गाडी गुरुवारी, (ता.25) रोजीपासून दिवा येथून सकाळी 6.55 वाजता सुटण्याऐवजी दिवा येथून सकाळी 6.25 वाजता सुटेल.

हेही वाचा: अट्टल हल्लेखोरास अटक; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

गाडी क्रमांक 10105 दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसची प्रत्येक स्थानकात येण्याची/ सुटण्याची वेळ बदलली आहे. गुरुवारी, (ता.25) रोजीपासून येण्याची/सुटण्याची वेळ कळंबोली येथे सकाळी 6.39/6.40 वाजता, पनवेल येथे सकाळी 7.20/7.25 वाजता, आपटा येथे सकाळी 7.44/ 7.45 वाजता, जिते येथे सकाळी 7.54/7.55 अशी असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

loading image
go to top