esakal | गौरी गणपतीसाठी कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय करा; वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने केली मागणी..
sakal

बोलून बातमी शोधा

travelers

:खिशात पैसा नाही. खायला अन्न नाही. अशा परिस्थितीत नेहमीप्रमाणे गौरी गणपती सणांसाठी कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहीले आहे. 

गौरी गणपतीसाठी कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय करा; वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने केली मागणी..

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: कोरोनाच्या माहामारीत मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांच्या हाताला काम नाही, खिशात पैसा नाही. खायला अन्न नाही. अशा परिस्थितीत नेहमीप्रमाणे गौरी गणपती सणांसाठी कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहीले आहे. त्यामूळे राज्य सरकारनेच कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय करण्याची मागणी वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघंटनेने केली आहे. 

कोंकणात गौरी गणपचीचा सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या माहामारीमूळे या सणांवर गडांतर आले आहे. महिन्याभरात गौरी गणपतीचा सण आला असतांना, मुंबईतील चाकरमान्यांजवळ मात्र आता, गेल्या तिन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने आर्थीक चणचण निर्माण झाली आहे. 

 हेही वाचा: रुग्णसेविकांच्या वेतन कपातीबाबत खुलासा करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश.. 

अशा परिस्थितीत गावी पोहचण्यासाठी लागणारे सुमारे 8 हजार आणायचे तरी कुठून हा प्रश्न चाकरमान्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामूळेच राज्य शासनाने एसटीची सुविधा देण्याची मागणी वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने अध्यक्ष शांताराम नाईक, सरचिटणीस यशवंत जडयार यांनी केली आहे. 

चाकरमान्यांना स्वॅब टेस्ट अनिवार्य करावी:

गौरी, गणपती सणासाठी हजारो चाकरमाने आपल्या गावी कोंकणात दाखल होणार आहे. मात्र, मुंबईत सध्या कोरोनाची स्थिती फार बिकट असून, बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना, गौरी गणपतीला कोंकणात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची स्वॅब टेस्ट करूनच कोंकणात पाठविण्याचा मागणी सुद्धा यामध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा: 'त्या' स्टँडअप कॉमेडियन महिलेला धमकी देणाऱ्याला अखेर अटक; सायबर पोलिसांची कारवाई.. 

या विशेष मागण्या:

-. शासनाने गौरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची स्वॅब टेस्ट करूनच प्रवाशांना एसटीने गावी सोडावे
- ई-पासेस आॅनलाईऩ करून मोफत करावे, त्यामूळे चाकरमान्यांची लुट होणार नाही.
- सालाबादप्रमाणे याहीवर्षी एसटी चे जाण्याचे आरक्षण करावे.
- कोकणात दिड दिवसापासून गणपती विसर्जनापर्यंत बसेस डेपोत थांबवून मुंबईला सोडाव्यात 
- पावसाळा असल्याने होम क्वारंटाईन घरातच करून त्याचा कालावधी 7 दिवसाचा करावा
- क्वारंटाईन संदर्भातील सुधारीत निर्णय सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे
- कोकण रेल्वे मार्गावार मुंबई ते थिवीम दरम्यान सर्व स्टेशनवर थांबवणाऱ्या आरक्षीत स्लो रेल्वे गाड्यांची मागणी रेल्वे बोर्डाकडे करावी.

संपादन : अथर्व महांकाळ 

make arrangements for servents for ganesh festivals 

loading image
go to top