'त्या' स्टँडअप कॉमेडियन महिलेला धमकी देणाऱ्याला अखेर अटक; सायबर पोलिसांची कारवाई.. 

अनीश पाटील 
सोमवार, 13 जुलै 2020

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या महिला स्टँडअप कॉमेडियनला

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडलेल्या महिला स्टँडअप कॉमेडियनला व्हिडीओद्वारे अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी उमेश दादा ऊर्फ इम्तियाज शेखला(28) सायबर पोलिसांनी अटक केली.

नालासोपारा येथील रहिवासी असून तेथूनच त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी स्वतःहून याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. याबाबतची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. शेख हा शुभम मिश्रा या तरुणाचा मित्र आहे. मिश्रानेही अशा पद्धतीने धमकावले होते. त्यालाही वडोदरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 हेही वाचा: नवऱ्याच्या गाडीत पाहिलं 'ती'ला आणि बायकोने केली आख्खी मुंबई जॅम...

 महिलांना सन्मान देण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलीय. पण कुणी महिलांविषयी चुकीची भाषा वापरत असेल, धमकावत असेल तर अशांसाठी कायदा आहे. महाराष्ट्र सायबर या व्हिडीओची पडताळणी करा. तसेच मुंबई पोलिसांनी व्हिडीओतील व्यक्तीविरुद्ध  नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करा, असे ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. 

नुकताच एका महिला स्टँड अप कॉमेडियनने शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या वक्तव्यातून वाद उसळला होता. सर्व स्तरातून या महिला कॉमेडिअन विरोधात टीका होत असताना एका व्हिडिओमध्ये या तरुणाने सर्व सीमा पार करून या महिला कॉमेडियनला अश्लील भाषेत धमकावले होते. 

हेही वाचा: मुंबईजवळचा 'हा' जिल्हा ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट

त्याचवेळी उमेश दादानेही अशाच पद्धतीचा व्हिडीओ टाकून अश्लील शब्दात या महिलेला धमकावले होते. याप्रकरणी सायबर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला होता. या महिलेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्याबद्दलही पोलिस कायदेशीर सल्ला घेत असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही एका अधिका-याने सांगितले.

संपादन : अथर्व महांकाळ 

man who threat woman comedian finally get arrested by mumbai police  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man who threat woman comedian finally get arrested by mumbai police