
Mumbai Local automatic doors
ESakal
मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सातत्याने लोकलचे घडणारे अपघात पाहता अशा घटनांना आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लोकल्सना स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याची चाचणी सुरु करण्यात आली. दरम्यान आता चाचणी यशस्वी झाली असून स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याची माहिती समोर आली आहे.