
मुंबई : प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वे नियमितपणे मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष ट्रेनमध्ये तसेच मुंबई व पुणे विभागातील उपनगरी ट्रेनमधील सर्व विभागांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबवते. मध्य रेल्वेने एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत तिकीट तपासणीत विनातिकीट १४.४३ लाख प्रवाशांना पकडले असून त्यांच्याकडून एकूण ८६.७३ कोटींचा दंड वसूल केला आहे.